सोलापूर । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे खासगी ट्रॅव्हल बस ट्रकला धडकल्याने दोन जण ठार तर २० पेक्षा जास्त जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. यानंतर आता सोलापूर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल पलटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये ३० प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील २० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळ आढेगाव शिवारात आज पहाटे प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल पलटल्यामुळे दुर्घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्यांमुळे ट्रॅव्हल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे.
ट्रॅव्हल्समध्ये पुणे आणि मराठवाड्यातील प्रवासी होते. शिरपूर लातूर येथून पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल पहाटे पलटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ३० जण जखमी झाले आहेत.आढेगावजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांनाही या घटनेबाबात तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींनी तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातानंतर सोलापूर-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. टेंभुर्णी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.















Discussion about this post