मुंबई । सोने दरात सुरु असलेली चढ-उतार कायम असून आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. तुम्ही देखील सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी आजचे दर किती आहेत हे जाणून घ्या.
आज शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रती तोळा २७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानंतर एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९७,३१० रुपये खर्च करावे लागणार आहे. गुरूवारी सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली होती. गुरूवारी एक तोळा सोनं ९७,०४० रुपयांना मिळत होते. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
पण आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आज १० तोळे सोन्याच्या दरामध्ये २,७०० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्यासाठी तुम्हाला ९,९३,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दर वाढल्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना आता अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ८८,९५० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २१० रुपयांनी वाढ झाली आहे.
१८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७२,९९० रुपये खर्च करावा लागेल. तर आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम ९९.९० रुपये आणि प्रति किलोग्रॅम ९९,९०० रुपये इतकी झाली आहे.
Discussion about this post