Thursday, June 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; पत्रात काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; पत्रात काय म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादंग निर्माण केला आहे. या पुस्तकात त्यांनी राजकारणातील अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. याच दरम्यान, संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास पत्र लिहून पुस्तकाची एक प्रतही पाठवली आहे या पत्रात त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकार, तपास यंत्रणा आणि सत्तांतरावर टीकास्त्र सोडलं आहे.

राऊत यांनी लिहिलेलं पत्र केवळ औपचारिक नव्हतं, तर त्यातून त्यांनी ‘ईडी’च्या राजकारणावर, शिवसेनेतील फूट आणि तुरुंगातील खडतर अनुभवांवर भाष्य करत एकनाथ शिंदेंना थेटपणे लक्ष्य केलं. “आपण या घटनांचा साक्षीदार आहात,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंना आठवण करून दिली. ‘ईडी-सीबीआय’च्या दबावाला झुकलो नाही, स्वाभिमान जपला – या पुस्तकातून ते समजेलच!, अशा शब्दांत राऊत यांनी आपल्या संघर्षाचा ठसा उमटवला.

हे पुस्तक 17 मे रोजी जावेद अख्तर, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालं असून, त्यामध्ये राऊत यांनी आजवर न उघड केलेल्या अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. राज्याच्या राजकारणात या पुस्तकामुळे खळबळ माजली असून, एकनाथ शिंदे यांचा यावर काय प्रतिसाद येतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पत्रात काय म्हणाले संजय राऊत?
श्री. एकनाथ शिंदे,
जय महाराष्ट्र!
‘नरकातील स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले.
श्री. जावेद अख्तर, श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल !कळावे,
आपला नम्र,
(संजय राऊत)

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची संधी; पाटबंधारे प्रकल्प मंडळाअंतर्गत भरती

Next Post

सोन्याचा भाव पुन्हा वाढला; आजचा २४ आणि २२ कॅरेटचा भाव किती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

सोन्याचा भाव पुन्हा वाढला; आजचा २४ आणि २२ कॅरेटचा भाव किती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

विधानसभेत जळगावच्या केळी पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा गाजला; दोषींवर कडक कारवाईचे आदेश!

June 25, 2026
“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

June 25, 2026
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदांवर मेगाभरती ; १०वी उत्तीर्णांना मोठी संधी

१० वी उत्तीर्ण आहात? डाक विभागात व्हा ‘विमा प्रतिनिधी’; २ जुलैला भुसावळात भरती प्रक्रिया!

June 25, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राहणं, खाणं आणि शैक्षणिक साहित्य अगदी मोफत! मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू!

June 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page