मुंबई : यंदा वेळेपेक्षा आठ दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. यांनतर मान्सूनने महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी केला आहे.
कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३६ ते ४८ तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून त्यानंतर तो हळहळू उत्तरेकडे सरकणार आहे, याचा परिणाम म्हणजे जोरदार वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी ४०-५० किलोमीटर प्रती तास इतका राहण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. पुढील ४८ तासांमध्ये त्याची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गोव्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.















Discussion about this post