जळगाव : यावल तालुक्यातील महेलखेडी येथील मुस्कान अल्ताफ तडवी (वय २०) या विवाहितेने पतीसोबत दुचाकीवर प्रवास करत असताना विरावली गावाजवळ अचानक दुचाकी थांबवून शेतातील विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना गट क्रमांक ५७ मधील शेताजवळ घडली. पती अल्ताफ रहेमान तडवी याच्यासोबत मुस्कान गावी जात होती. दरम्यान, विरावली गावाजवळ मुस्कानने दुचाकी थांबवण्याची विनंती केली आणि त्यानंतर ती थेट शेतातील विहिरीत उडी मारली. पतीने आरडाओरड केली असता नागरिकांनी धाव घेत तिला विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुस्कानच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिचा पती अल्ताफ याच्यावर विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेचा पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.















Discussion about this post