जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात मोठी घसरण दिसून आली. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. यातच गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात २.६ अंशांनी वाढ झाली. शुक्रवारी जळगावचे तापमान ३६.५ अंशांवर पोहोचल्याने पुन्हा उकाड्यात वाढ झालेली आहे.
दरम्यान अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा व बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे शहरासह जिल्ह्यात ढगाळता निर्माण झाली असून आजपासून पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण असेल. तर रविवारी पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. चार दिवसांपूर्वी जळगावात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गुरूवारी ३३.९पर्यंत तापमान गेले होते. परंतु शुक्रवारी दुपारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पारा ३६.५ अंशांवर पोहोचल्याने पुन्हा उकाड्यात वाढ झालेली आहे.
आता तीन दिवस जळगाव शहरासह जिल्ह्यात ढगाळता आणि ऊन असे संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. १० मे रोजी दुपारी अंशतः ढगाळ वातावरण राहील. या दिवशी ३७ ते ४१ अंश तापमानाची शक्यता आहे. ११ मे रोजी उन आणि ढगाळ वातावरण असे संमिश्र वातावरण असेल. दुपारी पावसाची शक्यता आहे. १२ मे रोजी वातावरण ढगाळ राहील. तापमानात वाढ होवून तापमान ३८ ते ४१ अंशांवर राहील असा अंदाज हवामान यांनी वर्तवला.















Discussion about this post