सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. अशात ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या तीन दिवसापासून सोने दरात मोठी वाढ झाल्याने सोन्याचा तोळा पुन्हा जीएसटीसह लाखाच्या घरात गेला. मर आज शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत १,२५० रुपयांपर्यंत घट झाल्याचं दिसून आलं आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत आणि या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. अशातच आज २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,५०० रुपये आहे. याशिवाय २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,३०० रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोनं आणि चांदीचे दर काय आहेत ते जाणून घ्या.
कसा आहे सोन्याचा दर
आज म्हणजेच शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,१५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
कसा आहे आज चांदीचा भाव?
शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी चांदीचा भाव ९९,००० रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहूयात देशाीतल प्रमुख शहरांमध्ये कसा आहे आजचा सोन्याचा दर.















Discussion about this post