बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. बँक ऑफ बडोदाने ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदांच्या ५०० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज ३ मे २०२५ पासून सुरू झाली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार www.bankofbaroda.in किंवा ibpsonline.ibps.in/bobapr25 वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे. दुरुस्ती आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील २३ मे आहे. अर्जाची प्रिंट आउट ७ जून २०२५ पर्यंत काढता येईल.
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण (एस.एस.सी./ मॅट्रिक्युलेशन) असणे आवश्यक आहे. ज्या रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू इच्छितो त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या स्थानिक भाषेत तो प्रवीण असावा (म्हणजे उमेदवाराला ज्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या स्थानिक भाषेत वाचता, लिहिता आणि बोलता येत असावे).
पगार (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे)
१९५००- २२१६० – २६३१० – ३०२७० – ३३७८० – ३७८१५
निवड प्रक्रिया:- ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी.
परीक्षेत, इंग्रजी भाषा ज्ञान चाचणी, सामान्य जागरूकता, प्राथमिक अंकगणित आणि मानसोपचार चाचणी (तर्क) या चारही विभागांमधून प्रत्येकी २५ गुणांचे २५ प्रश्न असतील. पेपर ८० मिनिटांचा असेल. प्रत्येक भागासाठी २० मिनिटे असतील.
अर्ज शुल्क
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.६००/- + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क
– अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, EXS, DISXS आणि महिला उमेदवारांसाठी रु. १००/- + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क















Discussion about this post