जळगाव । अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. चीनने गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत केवळ पंधरा दिवसांत भरघोस प्रमाणात सोने खरेदी केले आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या स्थितीचा थेट परिणाम भारतातील, विशेषतः जळगावसारख्या सुवर्ण नगरीतील दरांवर झाला आहे.
जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याने तब्बल 99600 रुपये (जीएसटीसह) या उच्चांकी पातळीवर मजल मारली आहे. येत्या काही दिवसांत हे दर एक लाखांचा टप्पा सहज पार करतील, असा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $3,400.86 वर पोहोचला आहे. कमकुवत अमेरिकन डॉलर आणि जागतिक व्यापार चिंतांमुळे सोन्याच्या किमती नवीन उच्चांक गाठत आहेत. चांदीच्या किमतीतही 619 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा वायदा भाव 619 रुपयांनी वाढून प्रति किलो 95,656 रुपये झाला. मे महिन्यातील डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 619 रुपयांनी वाढला असून जागतिक बाजारात चांदी 0.72 टक्क्यांनी वाढून $32.79 प्रति औंसवर पोहोचली आहे. जागतिक तणाव आणि टॅरिफ वॉरमुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहेत.
जळगाव सोन्याचे आजचे दर 24 कॅरेटसाठी
24 कॅरेट सोने- 96700, जीएसटीसह 99600
22 कॅरेट सोने- 88577, जीएसटीसह 91243
चांदी- 96500 प्रतिकिलो, जीएसटीसह 99400















Discussion about this post