डीआरडीओमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डीआरडीओने गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (जीटीआरई)अंतर्गत भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरतीद्वारे १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती drdo.gov.in या वेबसाइटवर मिळेल.या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी त्यापूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
डीआरडीओमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (इंजिनिरिंग)साठी ७५ जागा रिक्त आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (नॉन इंजिनियरिंग) पदासाठी ३० जागा रिक्त आहे. डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनीसाठी २० जागा रिक्त आहेत. आयटीआय अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी २५ जागा रिक्त आहेत.
ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनियरिंग पदासाठी उमेदवारांनी बी.ई किंवा बी. टेक पदवी प्राप्त केलेली असावी. ग्रॅज्युएट नॉन इंजिनियरिंग पदासाठी बी.कॉम, बी.एससी, बी.ए, बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. डिप्लोमा किंवा आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी डिप्लोमा किंवा आयटीआय केलेले असावे.
या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.यानोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करु शकतात. तुम्ही अर्ज आणि कागदपत्रे गॅस टर्बाइन अनुसंधान प्रतिष्ठान, डीआरडीओ, सुरक्षा मंत्रालय, पोस्ट बॉक्स नंबर ९३०२, सीवी रमन नगर, बंगळुरु ५६० ०९३ येथे पाठवायचा आहे.















Discussion about this post