नंदुरबार : उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मची संख्या मोठी असून सर्वाधिक पोल्ट्रीफार्म हे नवापूर तालुक्यात आहेत. मात्र यातच राज्यात अनेक भागात बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाल्याने अनेक कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. आता याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पशु संवर्धन विभागाच्या वतीने पोल्ट्रीफार्म वरील कोंबड्यांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी आलेल्या बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोल्ट्रीवरील कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या होता. आता राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा धोका वाढला असल्याने जिल्हा प्रशासन आतापासून सतर्क झाले आहे.
जिल्ह्यात २० लाखांपेक्षा अधिक पक्षी
नांदेड येथे बर्ड फ्ल्यू असल्याचे समोर आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाकडे १३१ पोल्ट्रीची नोंद आहे. त्यात २० लाखाच्या पेक्षा अधिक पक्षी आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून सुरक्षितते संदर्भात उपाय योजना करण्यात आल्याची माहिती पशु संवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी झालेले पोल्ट्री चालकांचे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत.
रक्ताचे नमुने तपासणीसाठी
राज्यात पसरत असलेल्या बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी केली असून नियमित तपासणी केली जात असते. तर आता सुरक्षिता म्हणून कोंबड्याचे रक्त नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तरी पोल्ट्री मालकांना जैविक सुरक्षिता उपाय योजना करण्याचा सूचना दिल्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे.















Discussion about this post