बीड । बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २२ जानेवारीपर्यंत कराड पोलीस कोठडीमध्ये राहणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं होते. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते.
यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी 9 ते 10 ग्राउंडस मांडले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी कट रचला. अपहरणाआधी तीन आरोपींमध्ये फोनवरुन चर्चा झाली. १० मिनिटे त्यांचा फोनवर संवा सुरु होता. याशिवाय हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असे एसआयटीने सांगितले. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्याने आरोपींवर मकोका लावण्यात आला. एसआयटीच्या टीमने वाल्मीक कराडने केलेल्या गुन्ह्यांची यादी सादर केली.















Discussion about this post