मुंबई । राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून मोठं वादंग उठलं असून या प्रकरणात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव येत असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलंय.
काय म्हणाले अजित पवार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून तपास चालू आहे. आता कुठल्याही चौकशीत आरोप झाला तर तुम्ही दोषी आहे, आज एसआयटी चौकशी चालू आहे. सीआयडी चौकशी चालू असल्याचं अजित पवार म्हणालेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव येत आहे. यावरून पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न केला. त्यावर अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलंय. बीड प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहोत. या संदर्भात पक्ष न बघता जर कुणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करू नका. मुख्यमंत्रीही त्या त्या मताचे आहेत असं अजित पवार म्हणालेत.
प्रत्येकाची चौकशी करून किती फोन झले, कुणाचे कितीफोन कुणाला झाले, याचा बारकाईने लक्ष दिलं जात आहे. तितक्यात गांभीर्याने सरकारने लक्ष दिले आहे. अर्थात समोरील विरोधी पक्षातील लोकांना, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधींनी काय बोलायचे याचे अधिकार दिले आहेत. पण कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यायला पाहिजे.















Discussion about this post