जळगाव: गोजराई फाउंडेशनच्या वतीने जगवाणी नगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘साऊ पेटती मशाल’ या गीताने झाली. यावेळी महेश मोरे या शालेय विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुलेंच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर मनस्वी गायकवाड या चिमुकलीने सावित्रीबाईंच्या वेशभूषेत येऊन त्यांचे कार्य उलगडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोजराई फाउंडेशनच्या उपाध्यक्ष विद्या गायकवाड होत्या. यावेळी सौ. मनीषा दीपक तांबट, विद्या तुषार सोनवणे, ललिता अनिल पाटील, कल्पना संदीप सुरळकर, रेखा सुभाष आमोदकर, कीनु जितेंद्र आमोदकर, शालिनी नंदकिशोर पाटील, वैशाली दिलीप गायकवाड, नेहा मनोज गायकवाड, निर्मला दिलीप पाटील आणि लक्ष्मीबाई दामोदर गैहलोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. गोजराई फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.















Discussion about this post