बीड । बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे पडसाद राज्यातील राजकारणात देखील उमटत आहेत. वाल्मिक कराड हा सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सल्याची टीका देखील विरोधकांकडून होत आहे. तसेच या आरोपीला धनंजय मुंडे मदत करत असल्याचे खळबळजनक आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. परंतु, आता यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत.
वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचा आरोप देखील वारंवार होत असून यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. मात्र आमदार धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन !
हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र
जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले
३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
दरम्यान, अंजली दमानिया यांनी या हत्या प्रकरणात मोठा दावा करणारी काही महत्वाची कागदपत्र एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत. मात्र यावेळी ही कागदपत्रे म्हणजे जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला आहे.यासोबतच अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या सातबाऱ्यांमध्ये देखील इतर काही नावांसोबत धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचंही नावं स्पष्टपणे दिसत आहेत. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून त्या कागदपत्रांची देखील सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे.















Discussion about this post