तुम्हीही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती indianbank.in या वेबसाइटवर दिली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे.
इंडियन बँकेत सध्या डॉक्टर पदासाठी भरती करण्यात येत आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.इंडियन बँकेतील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता :
इंडियन बँकेतील डॉक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त अॅलोपॅथिक मेडिकल सिस्टीममधून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्यांच्याकडे १० वर्षे कामाचा अनुभव असायला हवा.
इंडियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शॉर्टलिंस्टिग केली जाणार आहे. तसेच उमेदवारांच्या परफॉर्मंसच्याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला २०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला इंडियन बँक, झासी अंचल, ९२, सिविल लाइन्स, झाशी येथे पाठवायचा आहे.
CRPF मध्ये भरती
सीआरपीएफमध्ये सध्या भरती सरु आहे.सीआरपीएफमध्ये वेटरनरी पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी crpf.gov.inया वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५००० रुपये मानधन मिळणार आहे. त्याचसोबत अनेक भत्तेदेखील दिले जाणार आहेत.















Discussion about this post