जळगाव । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गारठा वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान हे १० अंशाच्या खाली गेले होते. मात्र आता फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी आठवडाभरासाठी विश्रांती घेणार आहे. तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात ढगाळ वातावरण असेल.
महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर( सोमवार ते बुधवार) असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर, भाग बदलत, अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः हा परिणाम, आज सोमवारी (२ डिसेंबर ला) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवेल. तर मंगळवार-बुधवारी (३ व ४ ला) नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ह्या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज?
जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी आगामी तीन दिवसात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला आहे.दरम्यान काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशापर्यंत घसरल्याने जळगावकरांना गुलाबी थंडी जाणवत होती. परंतु मागील दोन दिवसापासून हवामान अचानक बदल झाला. फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली आहे.















Discussion about this post