मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवला असून महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, कराड दक्षिण मतदार संघातून धक्कादायक निकाल आलेला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्याच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले निवडणूक लढवित होते. अतुल भोसले मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरुवातीपासून आघाडीवर होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कायम कॉंग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. येथून सात वेळा कॉंग्रेसचा विजय झालेला होता.
पिछाडी
अकराव्या राऊंड नंतर देखील भाजपाचे अतुल भोसले १६,५७३ मतांनी कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पासून पुढे होते. अखेर पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा अशा प्रकारे धक्कादायक पराभव झाल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.















Discussion about this post