वाशिम । देशासह राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. यातच एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एसटी बसने दुचाकीला ५० फुटापर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना रास्तारोको आंदोलन केले. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की एसटी बसने दुचाकीला ५० फूटांपर्यंत फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातामुळे नागरिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी काही काळ अकोला – हैद्राबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अपघातामध्ये मृत्यू झालेले दोघेही वाशीमच्या उकळी पेन गावचे रहिवासी अल्याची माहिती मिळतेय.















Discussion about this post