जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्यानिमित्ताने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. निवडणूक आयोगासह पोलीस यंत्रणा राज्यात प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. असे असताना जळगावात कोट्यवधी रुपयांच्या सोने आणि चांदीच्या विटांसह दागिने घेऊन येणारे वाहन पोलिसांनी पकडले आहे.
शुक्रवारी रात्री ८ पथकांकडून वाजेच्या सुमारास जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या आर.एल. चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान एमआयडीसी पोलिसांसह निवडणूक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील बाफना, स्वस्तिक आणि निलांजली या ज्वेलर्सने पुण्यातून ५ कोटी ५९ लाख रूपयांचे सोने-चांदींच्या विटांसह दागिने मागवले होते. या विटा पुण्यातून स्वीक्वेल कंपनीच्या वाहनातून (एम.एच.१२.यू.एम.५६२०) जळगावात येते होते.
शनिवारी देखील पुन्हा पंचनामा करत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यानंतर सायंकाळी संपूर्ण दागिने एका पेटीमध्ये सीलबंद करत कोषागारात पाठवण्यात आले. दरम्यान, ज्या वाहनातून दागिने आले, त्या चालकाकडे संपूर्ण कागदपत्र होती.















Discussion about this post