जळगाव । तरुणांमध्ये आत्महत्या सारख्ये प्रमाण वाढत असताना दिसत असून ही चिंतेची बाब आहेत. अशातच जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शनिवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली असून या घटनेने परिसरातएकच खळबळ उडाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लहू बाळू पाटील (३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, ७ वर्षांचा मुलगा, ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीत ते कामाला होते. शुक्रवारी रात्री लहू पाटील व त्यांचे कुटुंबीय पुढील खोलीत झोपले होते. मध्यरात्री २ ते अडीच वाजेदरम्यान ते पाणी पिण्यासाठी उठल्याचे पत्नीने पाहिले होते. मात्र त्यानंतर मध्यरात्री लहू पाटील यांनी मागील खोलीत जाऊन गळफास घेतला.
सकाळी ६ वाजता पत्नी झोपेतून उठल्यानंतर मागील खोलीचा दरवाजा लोटला असता पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पत्नीने हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी शेजारील मंडळी व नातेवाईकांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post