शिंदे । आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांना ओपन चॅलेंज दिल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देते की, त्यांनी व्यासपीठावर उभे राहून जातीय जनगणना करणार असल्याचं एकदा जाहीर करावे. ते आरक्षणाची जी 50 टक्क्यांची मर्यादा आहे, ती हटवतील.”
प्रियांका पुढे म्हणाल्या, “ते व्यासपीठावर उभे राहून सांगतात की माझा भाऊ आरक्षणाच्या विरोधात आहे. तो व्यक्ती, ज्याने मनिपूर ते मुंबईपर्यंत न्याययात्रा केली. त्या व्यक्तीविरोधात बोलतात की, ते आरक्षणाच्या विरोधात आहेत. खोटं बोलतात.”
“हे लोक आपल्यासोबत भेदभावही करतात. महाराष्ट्रातून यांनी अनेक उद्योग दुसरीकडे पाठवले. एक पंतप्रधान आणि एका सरकारची दृष्टी काय असायला हवी? एक पंतप्रधान आणि सरकार आई आणि पित्यासमान असतात. त्यांनी भेदभाव करायला नको. महाराष्ट्रातून उद्योग हटवले, दुसऱ्या राज्यांत पाठवले,” असा आरोपही यावेळी प्रियांका गांधी यांनी केला.
नरेंद्र मोदींनी सगळ्यांना कमकुवत करण्याचं काम केलं. मात्र, उद्योगपतींना कर्जमाफी. शेतकऱ्यांना काय मिळालं. पैसे नसल्याचे सांगतात. मग, उद्योगपतींचे कर्ज माफ कसे झाले? तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. दोन लाख सरकारी पदे आज रिक्त आहेत. ती सुद्धा भरली जात नाही. युवक आत्महत्या करायला लागेल. जातीच्या नावावर लक्ष विचलित करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. असही प्रियांका गांधी म्हणाल्या.















Discussion about this post