जळगाव । शहरातील इच्छादेवी पोलिस चौकीलगत अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर गॅस भरताना स्फोट झाला होता. त्यातील गंभीर जखमी सूरज दालवाले (वय २४) या तरुणांचा सोमवारी रात्री जीएमसीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच त्याचे वडील भरत सोमनाथ दालवाले (५५, रा. यमुना नगर) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. आता या स्फोटातील मृतांची संख्या चार झाली आहे.
गेल्या मंगळवारी जळगाव व सूरज दालवाले नाशिक येथील दालवाले कुटुंबीय अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर धार्मिक कार्यक्रमाला भाड्याने घेतलेल्या व्हॅनने निघाले होते. चालक इच्छादेवी पोलिस चौकी शेजारील अवैध रिफिलिंग सेंटरमधून गॅस भरत असताना टाकीचा स्फोट होऊन १९ जण भाजले गेले. त्यात दालवाले कुटुंबातील सात जणांसह व्हॅन चालक, गॅस सेंटर चालक, शेजारील पंक्चर दुकानदार व धुळे येथील पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता. रविवारपर्यंत गॅस सेंटर चालक दानिश, भरत दालवाले व व्हॅन चालक संदीप शेजवळ या तिघांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी जीएमसीत उपचार सुरू असलेला तरुण सूरज दालवाले याच्या हृदयाचे ठोके मंदावले होते. म्हणून त्याला सायंकाळी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमींची प्रकृतीही गंभीर झाली आहे.















Discussion about this post