जळगाव । राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात तापमान घसरण झाल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मात्र अशामध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिमाण इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा १२.२ अंशापर्यंत घसरल्यामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. राज्यातील किमान तापमानामध्ये घट होत आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.
राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यामध्ये गुरूवार आणि शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.















Discussion about this post