हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने नॉन एग्जीक्यूटिव पदांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यामध्ये एकूण 57 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे. या नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
रिक्त पदाचा तपशील
या भरतीद्वारे विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे, त्यात डिप्लोमा टेक्निशियन (मॅकेनिकल) पदासाठी ८ रिक्त जागा आहेत. डिप्लोमा टेक्निशिनयनसाठी २ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी २ जागा तर इलेक्ट्रिकल डिप्लोमा टेक्निशियन FSR साठी ३ जागा रिक्त आहेत. ऑपरेटर, फिटर, टर्नर अशा विविध पदांसाठीही रिक्त जागा आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदानुसार संबंधित क्षेत्रात इंजिनियरिंग डिप्लोमा/ केमिस्ट्रीमध्ये एमएससी/ आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला २०० रुपये फी भरावी लागणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला हिंदुस्तान एयरोनॉटिक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर करिअर या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करा. तुमची सर्व माहिती भरुन सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करा.
यानंतर तुमची माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.















Discussion about this post