यवतमाळ । माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यवतमाळ येथील वणी येथे उद्धव ठाकरे आज सभेसाठी गेले होते. त्यावेळी हेलिपॅडवर ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
यांनतर उद्धव ठाकरे यांनी भाषणातून घणाघाती हल्ला चढवला. माझी बॅग चेक करायला हरकत नाही. मात्र, त्या दाढीवाल्या मिंद्याची, मोदी, अमित शाह, गुलाबी जॅकेट आणि टरबूजची बॅग चेक केली का? अशी टीका ठाकरे यांनी केली.
ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती केलेली दिसत आहे. ठाकरेंच्या प्रश्नाला निवडणूक अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे व्हिडीओतून दिसत आहे.
वणीमधील सभेमधून उद्धव ठाकरे यांनी बोलताना पीएम मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले की स्वतः मोदी यांना बाळासाहेब यांचे नाव घेऊन मते मागावी लागत आहेत. त्यामुळे मोदी गॅरेंटी चालत नाही हे आता कळालं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपण तीन हजार रुपये देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगित. त्यांनी 370 कलम काढले, काय फायदा झाला? बाळासाहेब भाजपला कमलाबाई असे म्हटले होते. काँग्रेससोबत राहिलो तर शिवसेनेची काँग्रेस होईल का? असेही ते म्हणाले.















Discussion about this post