सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगाने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागितले जात आहे.
असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी ही भरती होणार असून या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://upsc.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे.
सीबीआयमध्ये असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा एम. टेक कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.ए लेव्हल डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
सीबीआयमधील असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी पे स्केल ७नुसार वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्जशुल्क २५ रुपये आहे.तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही आहे.















Discussion about this post