नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सोमवारी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते भारताचे ५१ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. नवीन सरन्यायाधीशचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत असेल, म्हणजेच ते या पदावर फक्त 6 महिनेच राहतील
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड रविवार, 10 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या निरोपाच्या भाषणात, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती खन्ना यांच्या भावी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांचे उत्तराधिकारी प्रतिष्ठित, स्थिर आणि न्यायासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.















Discussion about this post