जळगाव : आठ महिन्यांपासून विभक्त राहत असलेल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीला गंभीर जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील खेळी खुर्द येथे घडली. तर आईचे प्राण वाचविण्यासाठी गेलेला मुलगाही हल्ल्यात जखमी झाला आहे.
याबाबत असे की, माधुरी समाधान सपकाळे (वय ३५) हि विवाहित सदरच्या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित पती समाधान सपकाळे (रा. सुनसगाव, ता. भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित समाधान सपकाळे हा रिक्षा चालवितो. तर पत्नी माधुरी हि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावत होती. दोघे खेडी बुद्रुक येथे राहत होते. मात्र, पती संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद झाला. म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून समाधान हा सुनसगाव येथे राहत आहे. तर माधुरी दोन मुलांसह खेडी येथेच राहतात.
दोघांमध्ये होत असलेल्या वादामुळे महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दिलेला असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मध्यरात्री माधुरी सपकाळे व त्यांची मुले घरात झोपले असताना समाधान याने घराचा दरवाजा तोडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. ही झटापट सुरू असताना मुलगा विशाल भांडण सोडविण्यासाठी त्यांच्यामध्ये आला असता, त्याच्यावरही शस्त्राने वार केले. शस्त्राने वार केल्याने मायलेक गंभीर जखमी झाले. महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील महिला घटनास्थळी येताच संशयित समाधान तेथून पसार झाला. त्यानंतर जखमी माय-लेकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.















Discussion about this post