जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने ५ डिसेंबर रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन जिल्हयांसाठी जिल्हास्तरीय आणि ७ डिसेंबर रोजी विद्यापीठ प्रशाळांसाठी आविष्कार संशोधन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर १९ व २० डिसेंबर रोजी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा होईल.
५ डिसेंबर रोजी तीन ठिकाणी अविष्कार संशोधन स्पर्धा होणार आहे. जळगाव जिल्ह्याची स्पर्धा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब सुरेश पाटील महाविद्यालय, चोपडा, धुळे जिल्ह्याची स्पर्धा विद्या विकास मंडळाचे सि.गो. पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे आणि नंदुरबार जिल्ह्याची स्पर्धा नंदुरबार तालुका विधायक समितीचे जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार येथे होणार आहे. तर विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा विद्यापीठात ७ डिसेंबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील या स्पर्धा झाल्यानंतर विद्यापीठ पातळीवरील अविष्कार संशोधन स्पर्धा १९ व २० डिसेंबर रोजी विद्यापीठात होईल.
या स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात मानव्यविद्या, भाषा व ललित कला, Annदुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषि आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समोवश आहे. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, आणि पदव्युत्तरपदवी या तीन संवर्गात होणार आहे. पोस्टर, मोड्युलद्वारे विद्यार्थ्यांना आपला संशोधनाचा अविष्कार मराठी, हिंदी अथवा इंग्रजी या भाषेत सादर करता येईल. प्रवेशिका शुल्क २०० रूपये ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय ऑनलाईन नोंदणीसाठी २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत राहील. आविष्कार संशोधन स्पर्धेतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक (मेंटार) यांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून चोपडा महाविद्यालयातील डॉ. व्ही. आर. भुसे, उपसमन्वयक म्हणून डॉ. डी.डी. कार्डपवार धुळे जिल्ह्यासाठी साक्री महाविद्यालयातील डॉ. डी.एस. चव्हाण हे समन्वयक तर डॉ. पी.डी. तोरवणे हे उपसमन्वयक म्हणून काम पाहत आहेत. नंदुरबार जिल्ह्यासाठी जी.टी. पाटील महाविद्यालयातील डॉ. डी.एस. पाटील हे समन्वयक आणि डॉ. आर.आर. देवरे हे उपसमन्वयक म्हणून काम पाहत आहेत. विद्यापीठ प्रशाळेसाठी प्रा. रमेश सरदार हे समन्वयक व डॉ. विशाल पराते हे उपसमन्वयक म्हणून काम पाहत आहेत. संपुर्ण स्पर्धेचे समन्वयक प्रा.एच.एल. तिडके व उपसमन्वयक प्रा. नवीन दंदी हे काम पाहत आहेत. सचिव म्हणून विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आहेत.















Discussion about this post