मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सभा सुरु असून याच दरम्यान नेते मंडळींकडून अनेक खळबळजनक दावे केले जात आहे. याच दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या विशेष कार्यक्रमात मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 2012 सालच्या तत्कालीन आघाडी सरकारवर गंभीर आरोप करत त्यावेळी माझे एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असं ते म्हणाले आहे.
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
2012 ला इंदापूरला उसाचं आंदोलन सुरू होतं. चंद्रकांत नलवडे हा शेतमजुराचा पोरगा टेम्पोच्या आडोशाला उभं राहून आंदोलन बघत होता. पोलिसांनी समोरून जाऊन त्याला गोळी घातली. त्यावेळी मला येरवड्याच्या जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. तेव्हा बाहेर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तेव्हा सगळे रस्ते पॅक होते. मला तेव्हा पोलिसांनी आत येऊन सांगितलं की जामीन स्वीकारा आणि बाहेर येऊन सगळं शांत करा. मी जामीन स्वीकारून बाहेर आलो. तीन ते चार गाड्या बाहेर उभ्या होते. या गाडीत बसा, त्या गाडीत बसा मला असं पोलीस सांगत होते. मी विचार करत होतो, यांनी मला एवढ्या चांगल्या गाड्या बसायला कशा आणल्या. मी त्या डीवायएसपीचं नाव घेणार नाही. मला त्यांच्या नोकरीवर गंडांतर आणायचं नाही. त्यानं मला चालत-चालत हळूच सांगितलं की भाऊ जिथं-जिथं एक दोन ठिकाणी आंदोलनाची दंगल चालू आहे, तिथं तुम्हाल न्यायचं आहे आणि तुमचं एन्काऊंटर करायचं आहे, असं खोत यांनी सांगितलं.















Discussion about this post