सांगली : महाराष्ट्रात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला रंगत आली असून याच दरम्यान सांगलीमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीमधील भाजप नेते सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु करण्यात आल्याचे समजतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील पंढरपूर रोडवरील राम मंदिर जवळ ही घटना घडली. खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ माजली. मंदिराच्या जवळ असलेल्या लोकांची गर्दी झाली. तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमी अवस्थेत खाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे.
सुधाकर खाडे हे सांगलीमधील भाजपचे नेते आहेत. त्याआधी ते मनसेमध्ये होते. सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुधारकर खाडे यांच्या हत्येनं सांगलीमध्ये खळबळ माजली आहे.















Discussion about this post