मुक्ताईनगर । राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेचे आतापर्यंत पाच महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आले. दरम्यान, राज्यात अध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यातच मुक्ताईनगर येथील महायुती मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं असून त्याची तुफान चर्चा होतोय..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही तर कॉमन मॅन आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. उलट राज्यात आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये मिळतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.















Discussion about this post