मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
तर जळगाव जिल्ह्यात पाच जागांवर अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर मतदार संघातून उमेदवारी जाहीर झालीय






















Discussion about this post