बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. बीएमसीमध्ये ६९० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसारख्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.या नोकरीबाबत जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. तुम्ही २ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. ()
कोणती पदे भरली जाणार?
बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण ६९० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),तसेच सेकंडरी इंजिनियर ( सिव्हिल), यांत्रिकी आणि विद्युत इंजिनियर (Mechanical And Electrical Engineer) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ४१८००० ते १३२३३०० रुपये वेतन मिळणार आहे. तर सेकंडरी इंजिनियर पदासाठी ४४९०० ते १४२४०० रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरघोस पगाराची नोकरी मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे. (BMC Recruitment)
सिव्हिल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजीमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. तसेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्टशन इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.