जळगाव । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून या दरम्यान त्यांनी मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबावर निशाणा साधला होता.
खडसे परिवारात सध्या कोण कोणत्या पक्षात आहे? हे आपल्याला माहिती नसल्याची खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती. या टीकेनंतर एकनाथ खडसेंकडून त्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
रूपाली चाकणकर यांनी आधी स्वतःचं बघावं, ‘दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही, पहिले आपलं पाहावं. आपणही पहिले शरद पवार यांच्याकडे होत्या आता अजित दादा पवार यांच्याकडे आहात’, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.















Discussion about this post