Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 4, 2024
in जळगाव जिल्हा
0
खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
बातमी शेअर करा..!

जळगाव | ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या ,वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे त्यांना खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून आगामी ओलांपिक स्पर्धेत अथवा इतर स्पर्धेत सहभाग घेता यावा आणि त्यांना सक्षम मंच मिळावा यासाठी जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू झाले आहे असे केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, माननीय श्रीमती रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक संचालक स्पोर्ट एथोरिटी ऑफ इंडिया पांडुरंग चाटे , के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, उज्वला बेंडाळे , माजी आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे,सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केज़ो आणि के. सी . ई सोसायटीचे संचालक डी. टी. पाटील,प्रविणकुमार जंगले,भरत अमळकर,संजय प्रभूदेसाई,प्राचार्य अशोक राणे,हर्षवर्धन जावळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती खडसे यांनी प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडावे यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत जळगाव जिल्ह्यातील उद्योगपती यांनी सीएसआर फंडातून गरजू खेळाडूना प्रशिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरवातीला एकलव्य क्रीडा संकुलच्या विद्यार्थ्यानी मल्ल खांब प्रात्यक्षिक करून दाखवले. कान्ह ललित कला केंद्राच्या संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले. अखिलेश शर्मा यांनी मंगलाचरण सादर केले.
के. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी आपल्या प्रस्तावनेत खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुलात आयोजन केले याबद्दल आभार व्यक्त केले.

एकलव्य क्रीडा संकुलात विविध खेळाचे आयोजन केले जाते. त्यासह विविध स्पर्धा आयोजन करत असतो यासाठी के. सी.ई. सोसायटीत प्रशस्त मैदान,जिमखाना सुविधा उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यानी खेळांमध्ये सहभाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. खान्देशातील विद्यार्थ्याना विविध खेळ प्रकारात पारंगत होता यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. या मध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात.यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ,राज्य व जिल्हास्तराव आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. यावेळी माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडा क्षेत्रातील अडचणी आणि त्यासाठी मदत व्हावी याबद्दल आपले मनोगत मांडले.

या अनुषंगाने खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती ,बॉक्सिंग ,धनुर्विद्या,हॉकी ,खोखो ,कबड्डी ,वेटलिफ्टिंग,हॉलीबॉल ,फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य विकास यांचे मूल्यमापन होणार असून त्याकरिता एकलव्य क्रीडा संकुल चे ४० प्रशिक्षक व ३० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून जवळपास ८ ते १० हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत आहेत अशी माहिती मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर , प्रा.योगेश महाले यांनी केले. यावेळी विद्यार्थी खेळाडूंची मोठ्या संख्येने गर्दी होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात घरफोडीच्या घटना थांबेना! महिलेचे बंद घर फोडून सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास

Next Post

पीक पाहणीसाठी गेलेल्या चाळीसगावच्या शेतकऱ्यासोबत घडला दुर्दैवी प्रकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

पीक पाहणीसाठी गेलेल्या चाळीसगावच्या शेतकऱ्यासोबत घडला दुर्दैवी प्रकार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page