जळगाव । जळगाव जिल्ह्यात घरफोडीचे सत्र काही थांबत नसून अशातच जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शिक्षक कॉलनीतील महिलेचे बंद घर फोडून घरातून २ लाख २० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली मधुकर चौधरी (वय ४० रा. शिक्षक कॉलनी, म्हसावद ता. जळगाव) या महिला दि. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान बाहेर गेलेल्या होत्या. त्यावेळी घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.















Discussion about this post