मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान सर्वच पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून मात्र अशातच भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं कळतंय. अशातच आता अहमदनगरमधील विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार, भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विवेक कोल्हे हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. यावेळी कोपरगाव विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आणि उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पवार- कोल्हेंची आज भेट
अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार भाजपला धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं कळतं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post