मुंबई । मनीषा कायंदे यांनी शिंदे गटाचा प्रवेश केल्यानंतरत विधान परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ठाकरे गटाचं संख्याबळ कमी झाले. अशातच आता विरोधी पक्षनेते पदावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार मोल मिटकरी यांनी हा दावा केला असून त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद एकनाथ खडसेंना द्यावं असं मत मांडलं आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, विधानसभा आणि विधान परिषदेत ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त असतं, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो असं साधारण समीकरण आहे. विधानसभेत अजितदादा पवार विरोधी पक्षनेते आहेत, कारण विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 54 आहे आणि शिवसेनेचं कमी आहे.
मनीषा कायंदे यांनी शिंदे गटाचा प्रवेश केल्यानंतरत विधान परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ठाकरे गटाचं संख्याबळ कमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेमध्ये माझ्यासह 10 सदस्य संख्या जास्त आहे. शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. परंतु सदस्य संख्या जास्त असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावं असं माझं मत आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता वरिष्ठ सभागृहात आहे. भाजपला पुरुन उरायचं असेल तर महाविकास आघाडीने त्याच्याकडे हे पद द्यावं असं माझं मत आहे असे मिटकरी म्हणाले.
आता विधान परिषदेतील समीकरणं बदल्याने विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेचे आंबादास दानवे यांच्याकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आहे. आता या विरोधी पक्षनेते पदावार राष्ट्रवादीकडून दावा केला जातो का हे पाहावं लागणार आहे















Discussion about this post