चोपडा : 8वीत शिकणार्या आदिवासी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील मुळ्यावतार गावानजीक असणार्या पिंपरपाडा या पाड्यात घडली. लखीराम सीताराम बारेला (16) असे मृत बालकाचे नाव आहे.
लखीराम हा सकाळी झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता कोब्रा जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला. यानंतर थोड्याच वेळात प्रकृती बिघडल्याने त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लखीरामला मृत घोषित केले. या प्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात नोंद अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन डॉ.सागर पाटील यांनी केले.
यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला उपस्थित होते. मृत लखीराम हा हिंगणवाडे आश्रमशाळेत आठवीत शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.















Discussion about this post