मुंबई । आंतरराष्ट्रीय घडामोडीचा मौल्यवान धातूंवर होताना दिसतो. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे वर-खाली होताना दिसत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव अचानक १००० रुपयांनी वाढला होता. काल सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी झाल्यानंतर आज सोने तसेच चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या आहेत. तुम्हीही सोनं चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या नवीन दर..
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्यामध्ये १०० ग्रामचा भाव १००० रुपयांनी कमी झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा भाव ७१,६६० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,३२८ रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,१६६ रुपयांवर पोहचला आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव आज ५,३७,६०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५३,७६० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ४३,००८ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ५,३७६ रुपये आहे.
चांदीचा भाव किती?
आज चांदीचा भाव सुद्धा खाली घसरला आहे. १ किलो चांदीच्या किंमती तब्बल ५०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे आज ८३,००० रुपयांवर चांदीचा भाव आला आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये देखील सोन्याचा भाव खाली घसरला आहे. जळगाव, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या सर्व शहरांमध्ये सोन्याचा भाव ८३,००० रुपये प्रति किलो आहे.















Discussion about this post