नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी भरसभेत थेट पोलिसांनाच धमकी दिली. ‘मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की बायकोला फोन देखील लागणार नाही.’, अशा शब्दात रितेश राणे यांनी पोलिसांना दम भरला. सांगलीतील पलूस येथे शिवशक्ती-भिमशक्ती जन आक्रोश मोर्चा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लव्ह जिहादवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमधून पोलिस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिलाय. ‘सरकार हिंदूचे आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही.’,अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना धमकी दिली.
पलूस शहरामध्ये लव्ह जिहादविरोधात खासदार अमर साबळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधला. ‘पोलिस ठाण्यात लव्ह जिहादबाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्धा तासांत घेतली पाहिजे.अन्यथा पुढच्या तीन तासांत पोलिस ठाण्यात दाखल होऊन गोंधळ घालू.’ असा इशारा नितेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे.















Discussion about this post