नाशिक । मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप नाशिक मध्ये झाला. यावेळी मराठा आरक्षण आंदोलन नेते मनाेज जरांगे पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह छगन भुजबळांवरच घणाघाती प्रहार केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्याची चूक फडणवीसांनी करू नये, अन्यथा विधानसभेला तुमच्यासह भाजपचे उमेदवार मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. तर छगन भुजबळ ही नाशिकला लागलेली साडेसाती असून येत्या निवडणुकीत हा डाग पुसून येवल्याचे नाव पवित्र करणार आहे. मला म्हणतो, ८ जागा तरी निवडून आणून दाखव. तुझाच कार्यक्रम करतो बघ. तुझ्याच जिल्ह्यातील तुझे उमेदवार निवडून येतात की बघ आधी असा प्रहार मनोज जरांगे यांनी केला.
पक्ष, नेत्यापेक्षा समाजाला बाप माना. निर्णायक भूमिका घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत पाडायचे की उभे करायचे याचा फैसला २९ तारखेला घेऊ. त्यासाठी नाशिकसह राज्याच्या गावागावांतील मराठ्यांनी आंतरवालीत येण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, रॅलीचा समारोपमध्ये जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा उल्लेखही केला नाही.















Discussion about this post