जळगाव । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावात २२ वर्षीय फळविक्रेत्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडलीय. सलमान शकील बागवान (वय २४, रा.जोशीपेठ, बागवान वाडा) असे मयत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशिक्षकांच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी पेठेतील बागवान वाड्यात सलमान हा आई, वडील शकील बागवान, मोठा भाऊ व तीन बहिणींसोबत राहत होता. सलमान हा सट्टीच्या निमित्ताने रविवारी १८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मित्रांसोबत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता.
रविवार असल्याने पोहण्यासाठी पोहणाऱ्यांची संख्या मोठी होती. मित्रांसोबत पोहत असतानाच, सलमान तलावातील जास्त खोलीच्या भागात पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. येथील सुरक्षारक्षकांनी बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मृत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी होती.















Discussion about this post