जळगाव । जळगावममधील सागर पार्कमध्ये शासनाकडून महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे. जर तुम्ही महायुतीला आशिर्वाद दिला नाही. तर तुमच्याकडून 1500 रूपये काढून घेऊ, असं आमदार रवी राणा म्हणाले होते.
काय म्हणाले फडणवीस?
आमचे नेते गमतीगमतीत बोलताना काहीही बोलतात, कुणीतरी म्हणतं की लाडकी बहीण योजनेचे पैस परत घेऊ. पण अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि मायाच मिळत असते. निवडणुका येतात – जातात पण मला विश्वास आहे. बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल. जो पर्यंत आमचं त्रिमूर्तींचं सरकार सत्तेत आहे. तोवर बहिणींसाठीची ही योजना कुणाचा बापही बंद करू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांना टोला
रोज हे नवीन नवीन खोटं सांगतात हे खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दात सांगतो. काही लोक खोटं बोलून बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत संविधान बदलल्याबद्दल खोटं विरोधकांनी पसरवलं. ज्या ठिकाणी चंद्राने सूर्या जोपर्यंत आहे. तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही. निवडणूक आल्या काय हे खोटो पसरवण्याचे काम करतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.















Discussion about this post