चाळीसगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चाळीगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. भरधाव कंटेनरने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. या अपघातात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील तळेगाव गावाजवळ घडली. या घटनेनंतर तणाव इतका वाढला की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी तैनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून तळेगावला जावं लागलं आहे.
या घटनेमुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. घटनेनंतर गावातील संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड करत कंटेनर पेटवून दिला. तसेच संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव-नांदगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली. पण पाच वर्षीय चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.















Discussion about this post