मुंबई । उद्धव ठाकरेंना ४८ तासांत दुसरा धक्का बसला आहे. तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली.
माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे यांच्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल का झाला आत्ताच का झाला? हा सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामातून त्यांना उत्तर दिलं असल्याची कायंदे यांनी म्हटले. बाळासाहेबांचे शिवसेना इथे आहे म्हणून मी इथे आहे. कोणी तरी सांगितलं कचरा निघून जात आहे. कचरातून ऊर्जा निर्मिती होते असं म्हणत कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.















Discussion about this post