जळगाव : बांगलादेशातील परिस्थीती गंभीर असून या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजबांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय व अत्याचार होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ तसेच तेथील हिंदू समाजाला संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार व मानव अधिकार आयोगाने दखल घ्यावी याबाबत सकल हिंदू समाजाच्या बैठकीत १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा बंदचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यवसायिकांनी बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
सकल हिंदू समाजाची जळगाव शहरात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या माहिती देण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज बोलत होते. यावेळी जामनेर येथील गुरूदेव सेवाश्रम शाम चैतन्य महाराज, श्री दत्त मंदिर सावदा, महंत सुरेश शास्त्री मानेकर, सावदा स्वामी नारायण गुरुकुल उपाध्यक्ष अनंत प्रकाश, गजानन महाराज वरसाळेकर, स्वामी नारायण मंदिर, सावदा स्वयम प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव विभाग कार्यवाहक अविनाश नेहते उपस्थित होते.
जनार्दन महाराज म्हणाले, की बांगलादेशातील परिस्थिती बिकट असून तेथील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध बांधवांवर प्रचंड अत्याचार होत आहे. केंद्राने या हिंदू बांधवांना सुरक्षितपणे भारतात आणून त्यांना भारतीय नागरिकत्व द्यावे अशी मागणी या जिल्हा बंदच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनापर्यंत पोहचविली जाणार आहे















Discussion about this post