आगामी विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येत असून त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. दरम्यान प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज शनिवारी (१० ऑगस्ट) राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली असून यानंतर बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल मोठे वक्तव्य केले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ”, असे वक्तव्य केले.माझी आणि शरद पवारांची भेट आधीच ठरली होती. मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं, त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. ज्याप्रमाणे जाती, धर्मांवर राजकारण होतं, त्याच प्रमाणे शेतकरी, शेतमजूर दिव्यांग आणि जे कोणी अडचणीत असणारी लोकं आहेत, त्यांच्यावर राजकारण व्हायला पाहिजे. ते मुद्दे चर्चेत यायला हवेत. यावरच शरद पवारांशी चर्चा झाली, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
मी महायुतीतील कोणत्याही नेत्यावर आरोप केलेला नाही. येत्या १ सप्टेंबरपर्यंत आम्ही महायुती सरकारला वेळ दिला आहे. तोपर्यंत मी सर्वच पक्षांचे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत आहे. अजून तरी शरद पवारांसोबत जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही. आम्ही सरकारला १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आता येत्या काळात बच्चू कडू महाविकासाआघाडीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.















Discussion about this post